भाजप कार्यालयात विजयोत्सव; फडणवीस मात्र गैरहजर

devendra fadanvis avoids celebration at mumbai bjp office after taking as deputy chief minister of maharashtra

राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेर संपला आहे. मात्र या सत्तासंघर्षाची भारतातच नव्हे तर जगभरात रंगली. एकनाथ शिंदे याच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले, यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा होती, मात्र अखेरच्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित केले, तर फडणवीसांनी स्वत: या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाजपमध्ये काही तर आलबेल नसल्याची चर्चा रंगली. मुख्यमंत्री पदासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी संधी दिल्याने देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा रंगली. ही नाराजी आज भाजप मुंबई कार्यालयात विजयोत्सवादरम्यान दिसून आली. कारण या विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीस यांनी अनुपस्थिती दर्शवली. मात्र त्याच्या अनुपस्थितीवरून राजकारणात उलट-सुलट चर्चांना उधाण आले.