उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नागपुरात; जंगी स्वागत

काल एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत १६४ आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत सादर केले. काल रात्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाण्यातील आपल्या निवास स्थानी पोहोचले. तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पोहोचले. यावेळी नागपूरात भाजप कार्यकर्त्यांकडून फडणवीसांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.