काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या सर्व नाट्यावर पडदा पडला. आज दुपारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सागर या निवासस्थानी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व नंतर राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले. आज सायंकाळी सात वाजता शपथविधी होईल, असे सांगण्यात येते. पण त्यांच्याबरोबर कोण-कोण शपथ घेतील, याची उत्सुकता सर्वांना आहे.