Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी तुम्हाला दमा आहे ? कोरोना व्हायरसमुळे होताहेत हे गंभीर परिणाम

तुम्हाला दमा आहे ? कोरोना व्हायरसमुळे होताहेत हे गंभीर परिणाम

ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे अशा लोकांवर कोरोना व्हायरसचा गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे.

Related Story

- Advertisement -

जगभरामध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. अनेक देशांमध्ये परत एकदा लॉक डाऊन लावण्याची वेळ आली आहे. भारतामध्येही अनेक राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला जरी सुरवात झाली असली तरी कोरोना व्हायरसची दुसरी लाट झपाटयाने पसरत आहे. अशातच ६० वर्षा पुढील वृधांना तसेच लहान मुलांना घराच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याखेरीज ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे अशा लोकांवर कोरोना व्हायरसचा गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे.

- Advertisement -

दमा आणि कोरोना व्हायरसची लक्षणे

कोरोना व्हायरस मध्ये ताप,खोकला,जुलाब,शरीरात कणकण येणे,थंडी वाजणे, यांसारखी लक्षणे आढळून  येतात. तसेच सुक्का खोकला,ओला खोकला,श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दम्याच्या रुग्णांमधे  दिसून येतात.

- Advertisement -

दम्याच्या रुग्णांसाठी डॉक्टरांनी लिहून दिलेली सामान्य औषधे वृद्ध व्यक्तींना कोरोना व्हायरसच्या सुरुवातीच्या स्टेजला फायदेशीर ठरू शकतात. असा अहवाल ‘मेडिकल जर्नल द लैंसेट’ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.

दमा असणारे व्यक्ती मुख्यत्वे त्रास झाल्यास इनहिलरचा वापर करतात. आणि याचाच फायदा त्यांना कोरोना व्हायरसच्या गंभीर आजारापासून वाचण्यास मदत होते.

दम्याचा त्रास हा माणसाच्या फुफुसांवर थेट परिणाम करतो. यामुळे माणसाला जलद गतीने चालण्यास,बोलण्यास ,श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. तसेच हा आजार गंभीर झाल्यास फुफुसांवर सूज देखील येऊ शकते. जर दम्यावर नियंत्रण न मिळवल्यास कोरोना व्हायरस दम्याच्या रूग्णाला घेरू शकतो.

ऑक्सवर्ड यूनिवर्सिटी च्या शोधकर्त्यांना एका संशोधना दरम्यान आढळून आले, जे रुग्ण श्वासाद्वारे बुडेसोनाइड औषध घेतात अशा रुग्णांना कोरोना झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही. तसेच त्यांचा कोरोना पासून बरे होण्यासाठी इतर रूग्णांच्या तुलनेत ही कमी वेळ लागतो.

कोरोना व्हायरस पासून बचावासाठी सर्वात महत्वाचे आहे तोंडाला मास्क लावणे. पण दम्याच्या रुग्णांना मास्क लावल्यावर श्वास कोंडला जात असल्यामुळे ते मास्कचा वापर  जास्त वेळ नाही करू शकत. म्हणून दम्याच्या रुग्णांनानी या वातावरणात बाहेर जाने टाळावे तसेच बाहेर जाण्याची गरज भासल्यास सूती कापडाचा मास्क लावून घराबाहेर पडावे.

औषध, इनहिलरच्या वापरा बरोबरच दम्याचे रुग्ण नेबुलाइजरचा सुद्धा वापर करतात. नेबुलाइजर ही एक एयरोसोल-जनरेटिंग प्रकिया आहे. म्हणून याचा कोणत्याही व्यक्तीशी संपर्क होऊ न देता वापर करावा. कोरोना बाधित तसेच इतर कोणत्याही आजारी व्यक्ती जर  आसपास असल्यास त्या व्यक्ती पासून दूर राहून नेबुलाइजारचा वापर करावा.

दम्याच्या रुग्णांनी कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिति ओढावल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा तसेच कोरोना व्हायरसच्या लसीकरणा वेळेस स्वत:ची मेडिकल कंडिशन डॉक्टराना सांगावी त्यानंतरच लसीकरण करावे


हे हि वाचा – कोरोना पॉझिटीव्ह आई बाळाला स्तनपान करू शकते का ? जाणून घ्या

- Advertisement -