घरफोटोगॅलरीDurgotsav 2021 : बंगाल क्लबव्दारे ८६ व्या दुर्गोत्सवाचे सेलिब्रेशन

Durgotsav 2021 : बंगाल क्लबव्दारे ८६ व्या दुर्गोत्सवाचे सेलिब्रेशन

Subscribe

बंगाली संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने मुंबईकरांना होते.

बंगाल क्लबव्दारे दरवर्षी दुर्गोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, यंदा या दुर्गात्सवाचे ८६ वे वर्ष आहे. मुंबईत स्थायिक झालेल्या बंगाली मंडळींना बंगालमध्ये दुर्गोत्सवासाठी जाता येत नसे. त्यामुळे त्यांच्या नव्या पिढीला आपली संस्कृतीची माहिती असावी या उद्देशाने दुर्गोत्सव साजरा करायला सुरुवात केली. बंगालमध्ये ही दुर्गा म्हणजे पार्वतीचं रूप आहे. पंचमीला पार्वती गणेश, कार्तिकेय, लक्ष्मी आणि सरस्वती अशा आपल्या दोन मुली आणि दोन मुलांसह  माहेरपणासाठी येते, अशी कथा आहे. म्हणूनच या दुर्गेसोबत तुम्हाला लक्ष्मी, सरस्वती, गणपती आणि मयूरावर विराजमान झालेला कार्तिकेयही पाहायला मिळेल. राक्षसाचा वध करणारी, अष्टभुजा मूर्ती तयार करायला दोन महिने लागतात. सजावटीसाठी दरवर्षी वेगवेगळी थीम असते. यंदा बंगालमधील समाज मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. बंगाली लोकांमध्ये महत्त्व असतं ते सिंदूर उत्सवाचं. दशमीला हा सिंदूर उत्सव केला जातो. यात विवाहित महिला एकमेकींना कुंकू लावतात. तेव्हा कुंकवाची उधळण केली जाते. मुंबईतल्या बंगाली संस्कृतीचे दर्शन त्या निमित्ताने मुंबईकरांना होते.

(छाया :- दिपक साळवी )

- Advertisement -

 


हे ही वाचा – Navratri 2021 : अलिबागच्या मूक-बधीर संजीव मोरेची कमाल ; नारळावर साकारतोय देवीची मूर्ती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -