CoronaVirus: कोरोनाच्या संकटात शिक्षकांनी खडू सोडून हातात घेतलं लाटणं!

during coronavirus lockdown primary teacher help for laborers in wardha
CoronaVirus: कोरोनाच्या संकटात शिक्षकांनी खडू सोडून हातात घेतलं लाटणं!

संपूर्ण जगात कोरोनाच संकट आलं आहे. सर्व देश या कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. त्यामुळे राज्यात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस यांच्यासह अनेक नागरिक कोरोनाच्या संकटात आपापल्या परीने साथ देत आहे. वर्धा जिल्ह्यात देखील स्थलांतरीत मजुरांसाठी शिक्षक धावून आले आहेत.