घरताज्या घडामोडीशिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची तीन तास ईडी चौकशी

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची तीन तास ईडी चौकशी

Subscribe

शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची आज सुमारे तीन तास ईडीने चौकशी केली. सिटी को-ऑप बँकेत सुमारे ९०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आनंदराव यांची चौकशी करण्यात आली. माहितीनुसार पुन्हा एकदा आनंदराव अडसूळ यांना चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्ती केली आहे.

 

आनंदराव अडसूळ यांच्यावर करण्यात आले ‘हे’ आरोप 

बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी ५ जानेवारी रोजी आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को-ऑप बँकेत घोटाळा करण्यात आरोप केला होता. मुंबईत या बँकेच्या १३-१४ शाखा असून यामध्ये ९०० खातेदार आहेत. अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज ही बँक बुडण्यास कारणीभूत आहे, असा आरोप रवी राणांनी अडसूळ यांच्यावर केला आहे. शिवाय बँकेची प्रॉपर्टी भाड्याने देऊन खातेदारांना आता फक्त १ हजार एवढी रक्कम मिळत असल्याचे रवी राणा म्हणाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – कपूर कुटुंबातील ‘या’ व्यक्तींनी घेतला जगाचा निरोप


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -