Photo : रंगात रंगूनी साऱ्या… मन काही भरेना!

भारतभरात फाल्गुन पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होलिकादहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, दोलायात्रा अशा अनेक नावांनी हा उत्सव ओळखला जातो. त्याच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे शहर बनले आहे. तेथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या ‘आनंद आश्रम’ला वेगळे महत्त्व आहे.

कोरोनाच्या दुष्टचक्रातून बाहेर आल्यानंतर सर्वत्र होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. एनएससीआय डोममध्ये धुळवडीचा आनंद लुटणारे वरळीकर.

मुंबई आणि ठाण्यात सर्वत्र धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. गिरगावातील हे ‘कुटुंब रंगलंय रंगात’

एकेकाळी तुफान गाजलेल्या ‘शोले’ चित्रपटात एक डायलॉग आहेत. ‘इतके सारे रंग आहेत… मग इतक्यात कसं काय मन भरणार?’ म्हणजेच, ‘रंगात रंगूनी साऱ्या… मन काही भरेना!’