२५ वर्षांहून अधिक काळ मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ह्या गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.मराठी चित्रपटांसह मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये तसेच मराठी नाटकांमध्ये देखील यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. इतकंच नव्हे तर, अभिनयाबरोबरच ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्या अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.