बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचे साडी या पारंपारिक पोशाखावर असलेले प्रेम कुणापासून लपलेले नाही. विद्या केवळ भारतीय कार्यक्रमांमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही साडी नेसणे पसंत करते. विद्याच्या वार्डरोबमध्ये हँडलूम, कॉटन, टसर आणि शिफॉनसारख्या वेगवेगळ्या फॅब्रिकपासून बनवलेल्या साड्या आहेत. दरम्यान, नुकताच विद्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लाल रंगाच्या सुंदर साडीमधील फोटो शेअर केले आहेत. विद्याने लाल साडीला शोभेल असे सुंदर कानातले देखील घातले आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -