रायगड : गुहागर-विजयपूर महामार्गावरील जत तालुक्यातील मुचंडी येथे ट्रकने एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 23 प्रवाशी जखमी झाले आहेत.
जत तालुक्यातील मुचंडी येथे मंगळवारी (6 जून) रात्री सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आगाराची सांगोला-विजयपूर बस ही विजयपूरच्या दिशेने जात होती. या बसमधून कर्नाटक सीमेलगतच्या बसथांब्यावर प्रवासी उतरत होते.
- Advertisement -
याठिकाणी तीव्र उतार आहे. त्याचवेळी साईराज ट्रान्सपोर्टचा ट्रक हा साखर भरून विजयपूरला निघाला होता. यावेळी भरधाव आलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि या ट्रकने थेट एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक एवढी जोरदार होती की बसचा चक्काचुर झाला. यात बस मधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर २३ जण गंभीर जखमी झाले.
- Advertisement -
यातील १२ जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे. त्यांना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी स्थलांतरित होत असताना लडाखमध्ये (Ladakh) भारतीय लष्कराचे वाहन (Indian Army vehicle) खोल दरीत कोसळून भीषण अपघात...
पुणे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यात तीन वेगवेगळ्या वाहनांचा विचित्र अपघात घडलाय. यामध्ये एका कंटेनरने दुसऱ्या एका कंटेनरला...