घरफोटोगॅलरीविदारक! विरार कोविड रुग्णालयातील आगीत १३ रुग्णांचा अंत

विदारक! विरार कोविड रुग्णालयातील आगीत १३ रुग्णांचा अंत

Subscribe

नाशिकमधील ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना विरारमधील विजय वल्लभ या खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 13 कोरोनाबाधित रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू घटना आज घडली. यात आगीत पाच महिला आणि 8 पुरुषांचा रुग्णांचा आगीत होरळून अंत झाला आहे.
आज पहाटे पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून या हॉस्पिटलमध्ये 90 रुग्ण उपचार घेत होते. त्यातील 17 कोरोनाबाधित रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटातच आगीने अतिदक्षता विभागात आगीचे तांडव झाले. आग लागली तेव्हा त्याठिकाणी 17 रुग्ण होते. आग लागल्यावर डॉक्टर आणि कर्मचारी सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले. चार रुग्णांना वाचवण्यात यश आले. पण, आगीत 13 रुग्ण दगावले आहेत.

 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -