कृष्णा नदीच्या पात्रात मगरींचा मुक्तसंचार

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पात्रात दहा मगरी आढळून आल्या आहेत. पलूस तालुक्यातील औदुंबर-भिलवडी-चोपडेवाडी नदीकाठी निसर्गप्रेमींना जवळपास दहा लहान-मोठ्या मगरींचा अधिवास पाहायला मिळाला आहे. तसेच या मगरींचा आकार सहा ते चौदा फुटांपर्यंत आहे. परंतु यंदा कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला ब्रेक मिळाला आहे. कृष्णा नदीत कारखान्याच्या प्रदूषित पाण्याचं प्रमाण वाढलं असून नदीतले मासे मृत्युमुखी पडले आहेत. खिलापिया मासे मगरीच्या खाद्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मुबलक खाद्य असल्याने मगरींचा वावर वाढला असल्याचं निसर्गप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.