गुरुवारी संपूर्ण देशभरात करवा चौथ साजरा करण्यात आला. याचं निमित्ताने महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. बॉलिवूड अभिनेत्री देखील हे व्रत आनंदाने साजरे करतात. त्यांचे काही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावेळी त्यांनी केलेला लूक देखील चांगलाच चर्चेत येत आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी प्रत्येक वर्षी आपल्या पतीसाठी करवा चौथचे व्रत करते. यावेळी शिल्पा शेट्टी लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती.
अभिनेत्री प्रीती झिंटाने देखील करावा चौथ साजरा केला. यावेळी प्रीतीने नारंगी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
अभिनेत्री कतरिना कैफचा हा पहिला करवा चौथ होता.
अभिनेत्री मौनी रॉयचा हा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ होता. यावेळी मौनीने सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती.
अभिनेता वरुण धवनच्या पत्नीने देखील करवा चौथ साजरा केला.
अभिनेत्री प्रियांका चोपडा देखील प्रत्येकवर्षी करवा चौथचे व्रत करते.