घरफोटोगॅलरीचकचकीत स्थानके, फुलांची आरास; मुंबईकरांचा नव्या मेट्रोसेवेला तुफान प्रतिसाद
चकचकीत स्थानके, फुलांची आरास; मुंबईकरांचा नव्या मेट्रोसेवेला तुफान प्रतिसाद
Mumbai Metro | स्वच्छ चकचकीत मेट्रो स्थानके, वातानुकूलित यंत्रणा, फुलांची आरास यामुळे मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. येत्या काळात इतर मेट्रो मार्गिकांप्रमाणेच या मार्गिकांवरही नियमित गर्दी वाढेल असाही विश्वास मुंबईकरांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो मार्गिका २ ए आणि ७ सेवेचे काल लोकार्पण केले. आज सायंकाळपासून या दोन्ही मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. या मार्गिकेमुळे मुंबईकरांचा बराचसा वेळ वाचणार आहे. त्यामुळे मेट्रो बसलेले प्रवासी निवांत दिसले. त्यातच, स्वच्छ चकचकीत मेट्रो स्थानके, वातानुकूलित यंत्रणा, फुलांची आरास यामुळे मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. येत्या काळात इतर मेट्रो मार्गिकांप्रमाणेच या मार्गिकांवरही नियमित गर्दी वाढेल असाही विश्वास मुंबईकरांनी यावेळी व्यक्त केला.
(सर्व फोटो – दीपक साळवी)
मुंबईच्या पश्चिम व उत्तर उपनगरांना दोन मार्गिकांद्वारे जोडणाऱ्या मेट्रो २ अ व मेट्रो ७चा पहिला टप्पा गेल्या एप्रिलमध्ये सुरू झाला.
३५ किलोमीटरचा हा कमानीच्या स्वरूपातील प्रवासाचा अनुभव मुंबईकरांना मिळणार आहे.
आता मेट्रो २ अ व मेट्रो ७ ही मार्गिका संपूर्ण तयार झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना उपनगरीय रेल्वेच्या पूर्वेकडे गुंदवली ते पश्चिमेकडील अंधेरी पश्चिम अर्थात डी. एन. नगरपर्यंत संलग्नता मिळणार आहे.
मेट्रो २ अ ही मार्गिका आनंदनगर (दहिसर पूर्व) ते डी. एन. नगर अशी आहे. तर मेट्रो ७ ही मार्गिका दहिसर पूर्व ते गुंदवली अशी आहे.
‘मेट्रो २ अ’ची एकूण लांबी १८.६० किमी तर मेट्रो ७ची एकूण लांबी १६.५० किमी आहे.
पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या उत्तर ते मध्य मुंबई (दहिसर ते अंधेरी) भागात पूर्व-पश्चिम जायचे असल्यास रस्त्यावरील वाहतूक टाळून मेट्रोने जाता येणार आहे.
अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानक हे मेट्रो १वरील (वर्सोवा-घाटकोपर) डी. एन. नगर तर गुंदवली स्थानक हे पश्चिम द्रुतगती मार्ग मेट्रो स्थानकाजवळ आहे.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ला मेट्रो १ मार्गिकेशीदेखील संलग्नता मिळेल. त्यामुळे दहिसरवरून थेट वर्सोवा किंवा घाटकोपर गाठता येणार आहे.
आजच्या पहिल्या दिवशी स्थानकाचे फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले होते.
पहिल्याच दिवशी प्रवाशांनी चांगला प्रतिदास दिला आहे.
चकचकीत मेट्रो, वातानुकूलितक वातावरण, मोकळी जागा यामुळे प्रवाशांना या नव्या मेट्रोचा चांगलाच फायदा होणार आहे.