भारतीय लग्नांमध्ये अनेक विधी असतात आणि त्यातील प्रत्येक विधीमध्ये नवरीच्या हातांची मोठी भूमिका असते. अशावेळी नवरीच्या हाताची नख सुंदर दिसण्यासाठी सुंदर आणि आकर्षक अशा रंगांचा वापर करा. जेणेकरून लग्न सराईमध्ये नवरीच्या नखांचा रंग उठून दिसेल.
नवरीच्या नखांना लाल रंग खूप उठून दिसतो. अनेकदा नवरीच्या साडीचा रंग लालच असतो. त्यामुळे हा रंग साडीला देखील मॅच होतो.
गुलाबी रंगाच्या शेड्स सर्वच महिलांना खूप आवडतात. तुम्ही लग्न सराईमध्ये या रंगाचा देखील वापरू शकता.
न्यू़ड आणि चमकदार रंगांचा वापर देखील तुम्ही करू शकता.
चमकदार रंगांच्या नेल पॅलीशने लग्न सराईमध्ये नखांना सुंदर करेल.
लग्न सराईमध्ये अनेक मुली सिल्वर किंवा गोल्डन मेटॅलिक रंगांची निवड करतात.