शिवसेनाप्रमुखांच्या 97व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिवादन

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे यानिमित्ताने राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. फोर्ट परिसरातील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आदी मान्यवरांनीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.