Happy Birthday Dhoni : माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा ४१ वा वाढदिवस

७ जुलै १९८१ मध्ये महेंद्र सिंह धोनी जन्म झाला होता.

आज भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा ४१ वा वाढदिवस आहे. ७ जुलै १९८१ मध्ये महेंद्र सिंह धोनी जन्म झाला होता. २३ डिसेंबर २००४ रोजी महेंद्र सिंह धोनीने बांग्लादेश विरोधी सामन्यात क्रिकेट क्षेत्रात पदार्पण केलं, मात्र त्यावेळी महेंद्र सिंह धोनीला हवं तसं यश मिळालं नाही. त्यानंतर पाकिस्तान विरोधी सामन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरचं पहिलं शतक मिळवलं. त्यानंतर त्याच्या क्रिकेट करिअरला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली.