Photo : दणक्यात पार पडलं ‘हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं लग्न

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. मागील काही दिवसांपूर्वी वनिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रेमाची कबूली दिली होती. दरम्यान, गुरुवारी या दोघांचं लग्न पार पडलं. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वनिताने तिचा प्रियकर सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली आहे. यावेळी हास्यजत्रेमधील अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. सध्या सोशल मीडियावर वनिताच्या लग्नाचे आणि हळदीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.