मुंबईतील ही रंगीत दुनिया पाहिलीत का? आर्ट फेस्टिव्हलला कलासक्तांची भरभरून दाद

Mumbai Urban Art Festival

Mumbai Urban Art Festival | मुंबईतील सर्वांत जुन्या सार्वजनिक डॉकपैकी एक असलेल्या ससून डॉकवर सध्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्यापासून स्टार्ट इंडिया फाऊंडेशनने येथे आर्ट फेस्टिव्हल भरवल्यापासून अर्ध्याहून अधिक मुंबईकरांनी ही रंगीत दुनिया पाहण्याकरता तिथे भेट दिली आहे. ससून डॉक हे 144 वर्षे जुने बंदर हेरिटेज आणि खाद्यपदार्थांसाठी योग्य ठिकाण आहे. तसंच, हा जुना डॉक जगभरातील कलाकारांसाठी एक कला केंद्र बनला आहे. (सर्व फोटो दीपक साळवी)