Photo – हिवाळ्यात पावसाळ्याचा फील; स्वेटर ऐवजी छत्र्या आल्या बाहेर

heavy rain likely in mumbai today
Photo - हिवाळ्यात पावसाळ्याचा फील; स्वेटर ऐवजी छत्र्या आल्या बाहेर

काही दिवसांपासून मुंबईत थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली होती. मात्र मालदीव, लक्षद्वीपच्या जवळ चक्रीवादळाचे वातावरण असल्यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि मुंबईत आज सकाळी अचानक अवकाळी पावसाची हजेरी लागली. यामुळे सकाळी सकाळी स्वेटर, शाल घेऊन बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची छत्री नसल्यामुळे तारांबळ उडाली. हिवाळ्याच्या दिवसात मुंबईकर छत्री घेऊ फिरताना दिसले. पाहा मुंबईतील अवकाळी पावसादरम्यानचे आजचे काही दृश्य…(छायाचित्र – दीपक साळवी)