पहिल्याच पावसाने मुंबईला चांगलांच झोपडून काढल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. आजसुद्धा सकाळीपासून मुंबईत मुसळधार पाऊस होता. अनेक ठिकाणी पाणी भरलं होत. पण दुपारीपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. पण येत्या ४८ तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिला आहे. आज आणि उद्या मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण आजच्या पावसातील मुंबईतीची स्थिती काय होती ते पाहा? (छायचित्र – दीपक साळवी)