मुंबईत पावसाची जोरदार हजेरी

मुंबई आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. सकाळी कामावर जाणारे चाकरमानी, शाळकरी मुलांना पावसातूनच मार्ग काढत जावे लागत आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.