समुद्राला उधाण, रस्ते पाण्याखाली मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच हवामान विभागाकडून मुंबईसाठी पुढील २ दिवस सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आजही मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला. त्याच पार्श्वभूमीवर दादर समुद्रकिनारी लाल बावटा लावला होता तसेच महापालिका प्रशासनाने जीवरक्षक तैनात केले होते. तर सायन येथील काही सखल भागात पावसाचे पाणी साचले होते , पण प्रशासनाने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून पंप लाऊन पाण्याचा उपसा केल्यामुळे फार काळ पाणी साचून राहिले नाही.