छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ (CSMT Station) जोडणारा हिमालय पूल (Hiamalay Bridge) आजपासून सुरू होणार आहे. चार वर्षांपूर्वी हा पूल अचानक कोसळला होता. तेव्हापासून या पुलाचे पूनर्बांधणीचे काम सुरू होते. अखेर हे काम पूर्ण झाले असून आजपासून हा पूल नागरिकांच्या सेवेत येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील हा पहिलाच पोलादापासून तयार करण्यात आलेला पूल आहे.
१९ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा हिमालय पूल अचानक कोसळला होता. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू तर, अनेकजण जखमी होते. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका तत्काळ अॅक्शन मोडवर येऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती.
या पुलाला नागरिकांसाठी सरकता जिनाही बसवण्यात आला आहे. परंतु, तो तुर्तास खुला करण्यात आलेला नाही.
या पुलाच्या बांधकामासाठी सात कोटींचा खर्च आला असून पुलाची लांबी ३३ मीटर आणि ४.४ रुंदीचा आहे.
या पुलाचा दररोज सुमारे ५० हजार पादचऱ्यांना फायदा होणार आहे
पुलाच्या पूनर्बांधणीसाठी स्टेनलेस स्टील म्हणजेच पोलादाचा वापर करण्यात आला आहे.
जुना पूल पूर्णतः पाडून या ठिकाणी नवा पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने काम रेंगाळले होते. परंतु, लॉकडाऊन उठल्यानंतर काम वेगाने सुरू करण्यात आले. अखेर, आजपासून हा पूल नागरिकांच्या सेवेत येणार आहे.
या पुलामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील गर्दी कमी होणार आहे.
मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय परिसर यांना जोडणारा हिमालय पूल नव्याने उभारल्यावर ३० मार्चपासून रेल्वे प्रवासी, पादचारी यांच्यासाठी खुला करण्यात...
मुंबई : सीएसएमटी (CSMT) व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय परिसर यांना जोडणारा हिमालय पूल (Himalaya Bridge) 2019 रोजीच्या दुर्घटनेनंतर चार वर्षांनी पुन्हा एकदा अधिक...
मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत विक्रमी वाढ झाली आहे. 2022-23 मध्ये ८१.८८ दशलक्ष टन मालवाहतूक मध्य रेल्वेवर झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ७६.१६ दशलक्ष टन लोडिंगच्या...
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ (CSMT Station) जोडणारा हिमालय पूल (Hiamalay Bridge) आजपासून सुरू होणार आहे. चार...
मुंबई : मुंबई महापालिकेने सात कोटी रुपये खर्चून सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय परिसर यांना जोडणाऱ्या हिमालय पुलाचे काम जवळजवळ पूर्ण...
मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया मुख्यालय परिसर यांना जोडणाऱ्या 'हिमालय'पुलाचे काम
जवळपास पूर्ण झाले आहे. कदाचित अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे मार्च अखेर...