घरफोटोगॅलरीचेहरा झटपट उजळवणाऱ्या घरगुती टिप्स!

चेहरा झटपट उजळवणाऱ्या घरगुती टिप्स!

Subscribe
face pack
चेहरा उजळ्याकरता फेस पॅक

अनेकांना हा प्रश्न पडतो कि चेहरा उजळ कसा करावा. तसे पाहायला गेलं तर सुंदर त्वचा प्राप्त करणे सोपे काम नाही. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावरील तेज कमी होते. तुम्हाला देखील ही समस्या उद्भवली असेल तर आज आम्ही तुम्हाला खास काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.

gram flour
बेसन पॅक

दोन छोटे चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एकत्र करावी. त्यामध्ये साधारण १० थेंब गुलाब जल व १० थेंब लिंबू टाकून त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप तयार करून घ्यावा. हा लेप रोज अंघोळीच्या आधी चेह-यावर साधारण अर्धातास ठेवावा व नंतर धुवून टाकावा. यामुळे चेहरा उठावदार नक्की दिसेल.

- Advertisement -
potato face pack
बटाटा पेस पॅक

डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलक्या हाताने मालिश करावी. असे केल्याने काळी वर्तुळे हळू-हळू कमी होण्यास मदत होईल.

honey face packs
मधाचा फेस पॅक

चेहरा तेलकट असल्यास एक चमचा मध १५-२० मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने लावल्यास तेलकटपणा कमी होतो. तुम्ही यामध्ये लिंबाचे ४-५ थेंब देखील टाकू शकता.

- Advertisement -
keshar face pack
केशर फेस पॅक

तुमची स्किन खूप ड्राय असेल तर एक लहान चमचा साय घेऊन त्यामध्ये थोडेसे केशर मिसळा. या मिश्रणाने चेहर्‍यावर मालिश करा. थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने चेहर्‍यावरील कोरडेपणा दूर होईल.

orange face pack
संत्र्याचा फेस पॅक

संत्र्याची साल वाळवून चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये थोडेसे कच्चे दूध मिसळून हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल होईल.

multani mitti face pack
मुलतानी माती फेस पॅक

मुलतानी माती सौंदर्यवर्धक आहे. माती आणि गुलाब जल एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो. प्रदूषणामुळे आलेला काळपटपणा हटवायला मुलतानी मातीचा वापर करता येतो.

kaju face pack
काजू फेस पॅक

काजू त्वचेसाठी उत्तम मानले जातात. काजू दुधात भिजवून बारीक कुटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. स्किन ड्राय असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे काही थेंब टाकून स्क्रब करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -