घरफोटोगॅलरीPhoto : महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, हुतात्म्यांना मानवंदना

Photo : महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, हुतात्म्यांना मानवंदना

Subscribe
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजारोहण केले.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला महाराष्ट्रदिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महागरपलिकेचे आयुक्त डॉ. आय.एस.चहल, जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय समारंभ दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संपन्न झाला. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शासन सेवेत नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
भूमी अभिलेख, राज्य कर, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांमध्ये या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -