Diwali 2021: दिवाळीच्या शॉपिंगसाठी दादर मार्केटमध्ये तुफान गर्दी

huge Crowed At Dadar Market For Diwali Shopping
Diwali 2021: दिवाळीच्या शॉपिंगसाठी दादर मार्केटमध्ये तुफान गर्दी

दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबईकरांनी मुंबईतील महत्त्वाच्या बाजारापेठांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली आहे. मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर मार्केट आणि प्लाझा शॉपिंग येथे दिवाळी खरेदीसाठी तुफान गर्दी झाली आहे. दिवाळीच्या दिवसात शासनाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दिवळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार असे दिसत आहे. दिवाळी साजरी करताना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले असले तरी मुंबईकर सगळे नियम धाब्यावर बसवून खरेदीचा आनंद घेताना दिसत आहेत. (छायाचित्र – दीपक साळवी )