राज्यामध्ये थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून किमान तापमानात पुन्हा घट झालेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली येऊन पोहोचला आहे. मुंबईमध्ये देखील दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत चालला आहे. मुंबईचे तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत येऊन पोहोचलं आहे. कमाल तापमानात देखील घसरण झाल्यामुळे मुंबईत पहाटे पासून अधिक गारठा जाणवत आहे. त्यामुळे थंडीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खरंतर थंडी वाढल्याने मुलांना स्वेटर घालून शाळेत जावे लागतेय. पालकही मुलांना कडाक्याच्या थंडीत दुचाकीवरून शाळेत पोहोचवत आहेत, तसेच मॅर्निंग वॉकसाठी जाणारे लोक देखील गारठले असल्याचं असं चित्रही सध्या पाहायला मिळतंय.
Photo by Sachin Haralkar
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -