Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeफोटोगॅलरीINS Guldar : आयएनएस गुलदार विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार

INS Guldar : आयएनएस गुलदार विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार

Subscribe

सिंधुदुर्ग (तेजस्वी काळसेकर) : भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ही नौका सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील पर्यटन वाढीसाठी आमदार, मंत्री नितेश राणे हे सतत प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून गुलदार ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात उभी करण्यात येणार आहे. ही नौका पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक विजयदुर्गला भेट देतील. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. नौकेचे स्थलांतर कर्नाटक येथील बंदरातून करण्यात येणार असून, पर्यटन महामंडळाने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. (INS Guldar will dock at Vijaydurg port)