पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून मेट्रो प्रकल्पाची पाहणी

cm and dcm

मुंबई – मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग ‘२अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी परिसरातील गुंदवली स्थानक येथे भेट देऊन लोकार्पण सोहळ्याची तसेच तेथील सुविधांची पाहणी केली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्हि. आर. श्रीनिवास, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते.