घरफोटोगॅलरीजलयुक्त विधानभवन...

जलयुक्त विधानभवन…

Subscribe

नागपुर अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कामकाज सुरू होण्यापुर्वीच लाईट गेल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि त्यामुळे कामकाज दिवसभर तहकुब करण्याची नामुष्की सरकारवर आली. विधिमंडळ परिसरात काल रात्रीपासून प्रचंड पाऊस सुरु असल्याने सभागृहाला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत गृहाजवळ मोठ्या प्रमाणात बॅक वॉटर आले. विद्युत गृहात पाणी शिरुन काही धोका अथवा अपघात होऊ नये, म्हणून एका तासासाठी विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याचे निवेदन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मात्र यामुळे विधानभवन परिसरात जलयुक्त शिवार योजना राबवल्याचे दिसले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -