कडाक्याच्या थंडीत Janhvi Kapoor ने पाण्यात लावली आग! बिकनीत केलं हॉट फोटोशूट

Janhvi Kapoor share Hot bikini photoshoot in mermaid look
कडाक्याच्या थंडीत Janhvi Kapoor ने पाण्यात लावली आग! बिकनीत केलं हॉट फोटोशूट

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती सतत अनेक फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. सिनेमांसोबतच जान्हवी दिवसेंदिवस तिचा फॅशन सेंस देखील डेव्हलप करताना दिसतेय. जान्हवी सध्या सोशल मीडियावर तिचे हॉट अँड स्वीट फोटो शेअर करुन तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे. नुकतेच तिने बिकनी फोटोशूट केले आहे. कडाक्याच्या थंडीत बिकनी घालून पाण्यात उतरलेल्या जान्हवीने चाहत्यांच्या मनात आग लावली आहे.

जान्हवीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्याचे ह्रदय धडकायला लागले आहे. अर्काडिया – फाइडिंग माय वे बॅक टू असे कॅप्शन देत जान्हवीने फोटो शेअर केले आहेत. जान्हवीने तिच्या घातलेल्या बिकनीची चर्चा सध्या होत आहे. कारण जान्हवीने घातलेली बिकनी 12-15 हजारांची नसून 17 हजारांची असल्याचे म्हटले जात आहे. जान्हवीने घातलेली स्विमवियर Zimmerman ब्रँडची आहे. त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जान्हवीच्या बिकनीची किंमत 17 हजार रुपये इतकी आहे.

जान्हवी तिच्या फोटोशूटमध्ये मेकअप बाबत फार अलर्ट असते. तिच्या प्रत्येक कॉस्टुमवर तिचा मेकअप देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. जान्हवीने प्रत्येक फोटोत तिच्या वेगवेगळ्या पोझेसने चाहत्यांना घायाळ केले आहे.

जान्हवीच्या वर्क फ्रंट विषयी सांगायचे तर जान्हवी आगामी काळात गुड लक जेरी, दोस्ताना 2 आणि तख्त या सिनेमातून प्रेक्षकांना भेटीला येणार आहे. पाहा जान्हवीचं बिकनीतील कमाल हॉट फोटोशूट ( फोटो : जान्हवी कपूर इन्स्टाग्रामवरुन साभार )