बॉलिवूड क्लीन कंगना राणावत आगामी धाकड चित्रपटासाठी रात्र दिवस मेहनत घेत आहे. या चित्रपटातील अॅक्शन स्टंटवरुन कंगनाने स्वत:ची तुलना टॉम क्रूजसोबत केली. याच चित्रपटातील कंगनाचा अॅक्शन स्टंट करतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. धाकडच्या सेटवरील काही फोटो कंगनानेही सोशल मिडियावर शेअर केले होते. ज्यात कंगना अॅक्शन सीन करताना अक्षश: घामाघूम झालेली दिसत आहे. त्यामुळे या फोटोतून तिचा आलेले थकवा अधिक जाणवत आहे.
या फोटोंमध्ये धाकड चित्रपटाचे दिग्दर्शक रजनीश घई देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करताना कंगनाने सांगिलते की, यावेळी मी वेगळ्या स्तरावर जाऊन मेहनत घेत आहे.
१० रात्र आम्ही १४-१४ तास शुटींग केली. रात्री सुरु होणारी शुटिंग सकाळी संपायची. यावेळी आमचे चीफ आम्हाला बोलायचे तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. यावेळी मी बोलले, मी तर तुमचीच आहे, जे करायचे ते करुन घ्या.
कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर तुफान ट्रेंड करत आहे. कंगना प्रत्येक सिनेमासाठी विशेष मेहनत घेत असते. या चित्रपटातही ती बॉलिवूडमध्ये कोणत्याही अभिनेत्री आत्तापर्यंत न केलेले कठीण स्टंट करताना दिसणार आहे.
धाकड चित्रपटाच्या निर्माते आणि कलाकारांकडून या बिग बजेट चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे, त्यामुळे हा अॅक्शन सिनेमा प्रेक्षकांना कितपत पसंतीस उतरतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.
कंगनाची महत्त्वकांशी चित्रपट थलाईवा देखील येता काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची शुटींगही नुकतीच पूर्ण झाली. तर कलाकरांकडून सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे.
या चित्रपटात कंगना जयललिता यांच्या भूमिकेत झळकरणार आहे. या चित्रपटातील तिचा लुक याआधीही चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे कंगनाच्या चाहत्यांकडून तरी या लुक्सला पसंती दिली जात आहे.