आलियाचा बेबी शॉवर थाटामाटात पडला पार; कपूर कुटुंबीयांच्या हजेरीने चार चाँद

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच आई होणार आहे. आलिया जरी आई होणार असली तरी ती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव असते. सध्या आलिया तिचे मॅटर्निटी लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. आलियाचे हे मॅटर्निटी लूक पाहून चाहते तिचं कौतुक करत असतात. नुकतंच आलियाचं बेबी शॉवर पार पडलं. बेबी शॉवर दरम्यानचे फोटो आलिया शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आलियासोबत रणबील देखील दिसत आहे. आलियाने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला असून रणबीरने कुर्ता परिधान केला आहे. आलियाच्या बेबी शोवरमध्ये तिचे आई-वडील देखील सहभागी झाले होते. आलियाच्या बेबी शोवरमध्ये तिच्या जवळच्या मैत्रिणी, बहिणी देखील आल्या होत्या. यावेळी सर्व कपूर कुटुंबीयांनी देखील हजेरी लावली होती.