नमन गणरायाला… ‘लालबागच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा २०२१

lalbaugcha raja 2021 lalbaugcha raja sarvajanik ganeshotsav mandal padya pujan ceremony held at lalbaug
नमन गणरायाला... लालबागच्या राजाचे पाद्यपूजन सोहळा २०२१

राज्यात कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. अशातच यंदा मात्र लालबागचा राजा विराजमान होणार असल्याची माहिती मंडळाने जाहीर केली. गेल्या वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘आरोग्य उत्सव’ साजरा केला होता. मात्र यंदा राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. यातच आज लालबागच्या राजाचा पाद्यपुजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.