पाहा! मिताली मयेकरचा ट्रेडिशनल टू वेस्टर्न लूक

मराठी मालिका आणि चित्रपटात काम करणारी अभिनेत्री मिताली मयेकरने ‘उर्फी’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटामुळेच मितालीला ओळख मिळाली. त्यानंतर ती ‘फ्रेशर’ तसेच ‘लाडाची मी लेक’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसून आली.२०२१ मध्ये मितालीचं अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्यासोबत लग्न पार पडलं. मिताली मीडियावर खूप सक्रिय असते. वारंवार ती तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करून चाहत्यांना भुरळ पाडते. कधी साडी तर कधी वेगवेगळ्या वेस्टर्न आउटफिटमधील फोटो ती शेअर करते. मितालीचे सोशल मीडियावर लाखों चाहते आहेत.