HomeफोटोगॅलरीMahakumbh Stampede : कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेचे हृदयद्रावक फोटो

Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेचे हृदयद्रावक फोटो

Subscribe

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात मंगळवारी मध्यरात्री चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगमाजवळ झालेल्या या चेंगराचेंगरीत 10 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून, अनेकजण जखमी झाले आहेत.

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात मंगळवारी मध्यरात्री चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगमाजवळ झालेल्या या चेंगराचेंगरीत 10 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून, अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सरकार आणि पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बुधवारी (ता. 29 जानेवारी) पहाटे 1 ते 2 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर या ठिकाणावरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा आणखी फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. (Mahakumbh Stampede Heartbreaking photos)