Mahaparinirvan Din 2024 : नव्या सरकारचे महामानवाला अभिवादन
मुंबई : भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज शुक्रवारी (ता. 06 डिसेंबर) 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्या दिवशी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमअनुयायी दादर, चैत्यभूमी येथे पोहोचले आहेत. अशातच राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. यावेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सुद्धा उपस्थि त होते. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर हा पहिलाच शासकीय कार्यक्रम आज चैत्यभूमी येथे पार पडला. (Mahaparinirvan Din 2024 Greetings to Dr. Babasaheb Ambedkar by the Mahayuti government)
भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनी राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा चैत्यभूमी येथे जाऊन अभिवादन केले. वेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सुद्धा उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंबेडकरांना पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर हा पहिलाच शासकीय कार्यक्रम आज चैत्यभूमी येथे पार पडला.
यावेळी अजित पवार यांनी सहाव्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उपमुख्यमंत्री म्हणून पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमात माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
चैत्यभूमीच्या आवारात असलेल्या दीपस्तंभाजवळ उभारण्यात आलेल्या व्यापीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी देशाच्या प्रगतीचे श्रेय संविधानाला दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
आमच्याकडून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना डोळ्यासमोरच ठेवूनच घेतला जाईल, असा विश्वास आम्ही व्यक्त करतो, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.