Photo : नाकात नथ..लाल चुडा…अन् कपाळी चंद्रकोर मानसी नाईकचा लूक चर्चेत

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकच्या अभिनयाचे आणि नृत्याचे लाखो चाहते आहेत. मानसी सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. मानसी सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. नुकतचं मानसीने पांढऱ्या सुंदर साडीमध्ये फोटोशूट केलंय. यात मानसीने नाकात नथ, हातात लाल बांगड्या आणि कपाळावर चंद्रकोर लावली आहे. मानसीच्या या लूकवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.