मुंबईः साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आणि मराठी नववर्षातील पहिला सण म्हणून प्रचलित असणार्या गुढीपाडव्यानिमित्त मुंबईसह संपूर्ण राज्यभरात खरेदीला उधाण आले आहे. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे. छोटी गुढी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. बाजारपेठेतील काही क्षणचित्रे…
बत्ताशेची माळ ही गुढीपाडव्याची मुख्य सजावट असते. बत्ताशेची माळ खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारपेठांमध्ये एकच गर्दी केली होती.
छोटी गुढी सर्वांचेच लक्ष वेधून घेते. त्यामध्येही सध्या बाजारपेठांमध्ये नवनवीन प्रयोग केले जाते. काठाचा पदर असलेली साडी. छोटी माळ याने गुढी अधिक शोभून दिसते.
कोरोनाचा धोका असला तरी मुंबईच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी एकच गर्दी झाली होती. गुढीपाडव्याला घर आणि सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.