शाळेचा पहिला दिवस,अन् महापौर विद्यार्थ्यांच्या भेटीला

विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांनी जय्यत तयारी...

Mayor Kishori Pednekar Visit Mumbai Municipal Corporation School At Worli
शाळेचा पहिला दिवस,अन् महापौर विद्यार्थ्यांच्या भेटीला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षांनी राज्यातील शाळा आज ४ ऑक्टोबरला सुरू करण्यात आल्या. महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेला भेट दिली. तसेच वर्गात उपस्थित असलेल्या विदयार्थ्यांशी संवाद साधला.राज्य सरकारने दिलेल्या सुचनांनुसार ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागामध्ये इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू झाल्या आहेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने शाळेत हजेरी लावली आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांनी जय्यत तयारी केल्याचे पहायला मिळत आहे. (छाया :- दिपक साळवी)


हे ही वाचा – School Reopen : एकदा उघडलेल्या शाळा बंद होऊ नये या निर्धाराने सुरुवात करु, मुख्यमंत्र्यांचे शिक्षकांना आवाहन