घरफोटोगॅलरीPhoto : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जे जे रुग्णालयात मॉकड्रिल

Photo : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जे जे रुग्णालयात मॉकड्रिल

Subscribe

गेल्या काही दिवसांत देशभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढत असल्याचे समोर आल्यान केंद्र सरकारने राज्यांना आरोग्यविषयक पायाभूत सुविधांच्या तयारीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आज, सोमवारी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात “मॉक ड्रिल” आयोजित करण्यात आले होते.

- Advertisement -

जेजे रुग्णालयातील ओपीडी आणि इतर वॉर्डांमध्ये “मॉक ड्रिल” घेण्यात आले. यादरम्यान औषधांचा साठा, क्ष-किरण मशीन, ऑक्सिजन पुरवठा उपकरणे आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता यांची तपासणी करण्यात आली.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली 7 एप्रिल रोजी कोविड-19 आढावा बैठक झाली. 10 किंवा त्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त संसर्ग दर आहे, अशा तीन राज्यांपैकी एक महाराष्ट्र असल्याचे या बैठकीत समोर आले. त्या अनुषंगाने हे मॉक ड्रिल घेण्यात आले.

7 एप्रिल रोजी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची 926 प्रकरणे नोंदवली गेली, ही रुग्णसंख्या 2023मधील राज्यातील सर्वाधिक होती. रविवारी राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 81,49,929 वर पोहोचली तर मृतांची संख्या 1,48,459 वर पोहोचली. महाराष्ट्रातील ‘मॉक ड्रील’ मंगळवारीही सुरू राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -