मुंबईतील चेंबूर परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन 4 ते 5 घरं जळाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या सिलिंडर स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
चेंबूरमधील कॅम्प परिसरात आज (29 नोव्हेंबर) सकाळी भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटाच्या हादऱ्यामुळे चाळीतील चार-पाच घरे धाडकन खाली कोसळी. तळ मजल्यावरील आणि पहिल्या मजल्यावरील घरांचं बरंच नुकसान झालं.
या स्फोटाची माहिती मिळतातच मुंबई अग्निशमल दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमल दलाच्या जवानांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या 11 जणांची सुटका केली.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव मोहिम सुरू केली. आत्तापर्यत सुमारे 11 नागरिकांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.1) विकास आंबोरे – 50 वर्षं 2) अशोक आंबोरे – 27 वर्षं 3) सविता आंबोरे – 47 वर्षं 4) रोहित आंबोरे – 29 वर्षं 5) राहुल कांबळे – 35 वर्षं 6) पार्थ सिंग – 21 वर्षं
या स्फोटात 5-6 जण जखमी झाले आहेत. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमी व्यक्तींवर गोवंडीतील शताब्द रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा स्फोट कोणत्या कारणामुळं ढालं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.