घरCORONA UPDATEMumbai Lockdown: मुंबईत लोकल ट्रेनला तूफान गर्दी, तर दुसरीकडे बाहेरुन येणाऱ्या...

Mumbai Lockdown: मुंबईत लोकल ट्रेनला तूफान गर्दी, तर दुसरीकडे बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी

Subscribe

मुंबई शहरात कोरोना रुग्णांनी ४० हजारांचा आकडा पार केला आहे. मागच्या काही दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मात्र मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. मुंबईतील प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची तूफान गर्दी पहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना लोकल ट्रेन बंद करण्याचा किंवा मुंबईसह राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले मात्र मुंबई लोकलमध्ये वाढणारी गर्दी पाहता मुंबईत लोकल प्रवासासाठी निर्बंध लावण्याची शक्यता आहे.

एकीकडे मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी पहायाल मिळत आहे. तर दुसरीकडे इतर राज्यातून किंवा जिल्ह्यातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मुंबईतील सीएसएमटी, मुंबई सेंट्रल, दादर यासारख्या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावरच त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच मुंबईत प्रवेश दिला जात आहे. ( फोटो – दीपक साळवी )

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -