घरफोटोगॅलरीNargis Dutt Birth Anniversary: अभिनेत्री नर्गीस दत्त बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहित...

Nargis Dutt Birth Anniversary: अभिनेत्री नर्गीस दत्त बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Subscribe

नर्गीसचे व्यक्तीगत आणि प्रोफेशनल आयुष्य नेहमीच चर्चेच्या झोतात राहिले. आज नर्गीसच्या जयंती निमित्त तिच्या आयुष्यातील काही रोचक माहिती जाणून घेऊया.

हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी दिग्गज अभिनेत्री नर्गीस दत्त यांची आज जयंती आहे. बॉलिवूडच्या पडद्यावर एके काळी राज्य करणारी तसेच आपल्या एका नजरेने घायाळ करणार्‍या नर्गीसचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच 1 जून 1929 मध्ये झाला होता. नर्गीसचे व्यक्तीगत आणि प्रोफेशनल आयुष्य नेहमीच चर्चेच्या झोतात राहिले. आज नर्गीसच्या जयंती निमित्त तिच्या आयुष्यातील काही रोचक माहिती जाणून घेऊया. नर्गीसचे वडील चंन्‍द उत्‍तम चंन्‍द – मोहन बाबू होते त्यांनी नंतर इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि रशीद नाव ठेवले. नर्गीसच्या आईचे नाव जद्दनबाई होते. नर्गीसने 1935 मध्ये वयाच्या 5 व्या वर्षी ‘तलाश-ए-हक’ या चित्रपटात पाहिल्यानंदा अभिनय केला होता. पण एक परिपूर्ण अभिनेत्रीच्या रूपात तिने 1942 मध्ये आलेला चित्रपट ‘तमन्ना’ मधून पदार्पण केले होते. अभिनेत्री नर्गीस दत्त पहिली अशी बॉलिवूड अभिनेत्री ठरली की तिला पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच राज्यसभा सदस्याची मानकरी ठरली.


हे हि वाचा – मानसिक,शारीरिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी अमृता खानविलकर गिरवतेय योगाचे धडे!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -