आज मंगळवार, २५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट येथे महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तयार होत असलेला केदार शिंदेदिग्दर्शित जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’च्या निमित्ताने ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या अजरामर गीताच्या पुनर्निर्मितआवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली होती. तसेच ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची संपूर्ण टीम देखील यावेळी उपस्थित होती.
राज्यभरात ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या अजरामर गीताच्या पुनर्निर्मितआवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी शरद पवार यांनी चित्रपटातील सर्व कलाकारांशी संवाद साधला.
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे.
यावेळी अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री सना केदार शिंदे , दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय, पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित होते.
मुंबई : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार गटाने शरद पवार गटातील आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात पुन्हा एकदा गुजरातमधील अहमदाबादला पुन्हा एकदा भेट घेतली आहे. गेल्या सहा महिन्यात...
मुंबई - शिवसेनेच्या अपात्र आमदार सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अपात्र आमदारांसंबंधी सुनावणी घेणार आहेत. 11 मे रोजी...