तिसऱ्या रांगेत उभे असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या फोटोवर मिम्स व्हायरल

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ आजही चर्चेत आहे. दरम्यान, अशातच आता पुन्हा एक प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. रविवारी दिल्ली येथे नीति आयोगाच्या परिषदेतील बैठकी दरम्यानचा एक फोटो सध्या प्रचंड प्रमाणात चर्चेत आला आहे. खरंतर या बैठकीमध्ये भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. दरम्यान, बैठक पार पाडल्यानंतर नीति आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या या फोटोमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वात शेवटच्या रांगेत उभे असलेले दिसत आहेत. एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे असल्याने महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे विरोधी पक्षातील नेत्यांचे मत आहे. फक्त नेतेचं नाहीत तर सामान्य लोक सुद्धा या प्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सोशल मीडियावरही यासंबंधीत अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.