स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात झळकतोय तिरंगा

आपण सर्वजण भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोणतेच सण साजरे केले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय सण देखील निर्बंधातच पार पाडले. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. तसेच, भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा स्वातंत्र्योत्सवाचा जल्लोष अधिक आहे. भारतातील अनेक ठिकाणी तिरंग्याच्या रंगाची विद्युत रोशनाई करण्यात आली आहे.