विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘कांदा आंदोलन’

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज, मंगळवारी दुसरा दिवस असून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. याचदरम्यान कांद्याच्या दरावरून विरोधकांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्यासह इतर आमदारांनी कांद्याची टोपली घेत विधानभवन परिसरात आंदोलन केलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी कांदा आणि लसनाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांकडून सरकारच्याविरोधात पोस्टर देखील दाखवण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, पृथ्वीराज देशमुख, अनिल देशमुख तसेच विरोधी पक्षातील इतर आमदार सुद्धा यावेळी उपस्थित होते.